काँग्रेसच्या दणक्याने वयोवृध्द दिव्यांगाला मिळाला न्याय

घुग्घुस : येथील शिवनगर निवासी मारोती हस्ते हे दोन्ही हाताने कमकुवत असून ते वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात आपल्या पत्नी सह सिफरचे काम करीत होते. मात्र कोरोनाचे कारण सांगून त्यांना 2020 मध्ये कामावरून कमी करण्यात आले.

मात्र त्यांचे व त्यांच्या पत्नीचे थकीत वेतन देण्यास ठेकेदार टाळाटाळ करायचा दमदाटी करायचा घरातून हाकलून लावायचा त्यामुळे हताश झालेल्या मारोती हस्ते यांनी काँग्रेस कार्यलयात अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्याकडे दाद मागितली काँग्रेस नेत्यांच्या दणक्याने ठेकेदारांने वेतनाची संपूर्ण रक्कम मारोती हस्ते यांच्या घरपोच पोहचवली व क्षमा मागितली. हस्ते परिवाराने काँग्रेस नेत्यांचे आभार मानले.