“पाँचसौ में बिक जाओगे तो ऎसा ही रोड पाओगे’;  समाज सेवक भूषण फुसे यांचे अनोखे आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपुर : शहरातील जवळपास सर्वच प्रभागातिल रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत, ठीक ठिकाणच्या रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे समजायला मार्ग नाही.
या विरोधात महानगर पालिका समोर व पालिकेत सुद्धा अनेक आंदोलने झालीत परंतु मनपा प्रशासनाने यावर अजुनपर्यंत तोड़गा काढून रस्ते सुधारले नाहीत.
हिच शहरातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन समाज सेवक भूषण फुसे यांनी काही दिवसांआधी स्वखर्चाने काही भागातील खड्डे बुजविले.
सोबतच ते इतरही समाज कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी दिव्यांग बाँधवाना आत्मनिर्भर करण्याकरिता राखी विक्री करण्यास मदत केली यापुढे इतरही कलाकुसर करण्यास आर्थिक व मानसिक मदत करीत असतात. तसेच किन्नर भगिनिसाठी त्यांनी मदत केली आहे.

असाच आज रस्त्याच्या मुद्द्याला घेऊन जनमानसात जनजागृति करण्याकरिता भूषण फुसे शहरातील खड्डे युक्त भागात अनोखे आंदोलन केले. महाकाली मंदिर परिसरातून सुरुवात करत, बागला चौक, समता चौक, आंबेडकर चौक व बंगाली कैम्प या भागात ‘500 में बिक जाओगे, ऐसाही रोड पाओगे, “जात पात बघाल तर गड्यात फसाल”, कुठे नेऊन ठेवला चंद्रपुर माझा” असे नारे लावत आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन बघून स्थानिक नागरिक सुद्धा या आन्दोलनाला जुडत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या नेतृत्वात जागरूक नागरिक आसिफ सय्यद, सचिन वाघमारे, डॉ. देबोश्री बार, सुमित शुक्ला, लोहित गोगोई व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या आगळ्या वेगळ्या आन्दोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.