वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, चिंतलधाबा बिटातील घटना

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : पोंभूर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत चिंतलधाबा बिटातील शेतशिवारात पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना आज मंगळवारी (21 ऑक्टोबर) ला घडली आहे. गजानन शिवराम मोरे वय (५५) रा. चिंतलधाबा असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

चिंतलधाबा बिटातील कक्ष क्रमांक ९७ लगच्या शेतात गजानन शिवराम मोरे (वय ५५) रा. चिंतलधाबा गुरे चारत होता. लगतच्या झुडपात धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याचावर अचानक हल्ला चढवून यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

जखमीला तात्काळ पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर जखम असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूर ला उपचारासाठी पाठविण्यात आले.