शहीद क्रांतिवीर बाबुराव शेळमाके यांच्या पुण्यतिथी दिनी काँग्रेस कार्यालयात शहीद दिन संपन्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : इंग्रजांच्या जुलमी, अन्यायकारक अत्याचारी साम्राज्यवादी शासना विरोधात वयाच्या चोविसाव्या वर्षी पांचशे आदिवासी युवकांना सोबत घेऊन इंग्रजांशी बंड पुकारणाऱ्या क्रांतीवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके (राजगोंड) यांच्या शहिद दिनी 21 ऑक्टोबरला घुग्घुस काँग्रेस कार्यलयात संघर्षाचे सदैव स्मरण रहावे याकरिता शहीद दिन साजरा करण्यात आला. क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,
कामगार नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते किशोर बोबडे, सुमेश रंगारी,गोगला शंकरजी, बालकिशन कूळसंगे, संजय कोवे, इर्शाद कुरेशी, कोंडय्या तलारी, सचिन कोंडावार, सुनील पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.