वाल्मिकी जयंती निमित्त युवा वाल्मिकी समाजातर्फे विविध कार्यक्रम संपन्न

घुग्घुस : महान कवी रामायण रचयिता, वाल्मिकी महर्षी यांच्या जयंतीनिमित्त घुग्घुस येथील युवा वाल्मिकी कृषी समाज संघटने तर्फे बुधवारी रोजी वाल्मिकी कृषी जयंती अगदी उत्साही व आनंदी वातावरणात पार पाडली गांधी चौक शिवमंदिरात नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.आर्शिया जुही यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

घुग्घुस पोलीस स्टेशन ठाणेदार राहुल यांच्या हस्ते नगरपरिषदेतील वाल्मिकी कृषी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. शहरातील शासकीय रुग्णालयात,तसेच डॉ.दास, डॉ.कोल्हे यांच्या रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.

शिव मंदिरात भजन कीर्तनाच्या कार्यक्रमा सह महाप्रसाद वितरण करण्यात आले व आतिषबाजी करून उत्साह साजरा करण्यात आला. समाजातील युवकांनी एकत्रित येत सदर कार्यक्रम स्वबळावर पार पाडला मात्र एका राजकिय पक्षा तर्फे सदर कार्यक्रम आपणच घेतला असा बनाव व प्रसिद्धी केल्यामुळे समाजबांधवात नाराजीचे सूर उमटले आहे.