व्यसनमुक्त व अवैध व्यवसायमुक्त गाव बनवा : रवि शिंदे

•भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
• स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारे आयोजन

भद्रावती : आजमितिला प्रत्येक गावात व्यसन पसरलेले दिसते. कुणी मद्याच्या आहारी तर कुणी तंबाखू, खर्रा आदी व्यसनाच्या आहारी गेलेला दिसतो, त्यामुळे व्यसनमुक्त गाव बनविणे आजची गरज आहे. सोबतच अनेक गावशेजारी अवैधरीत्या रेती, मुरुम, गौन खनिज चोरी, व अवैधरीत्या दारु विक्री होते, अशा अवैध व्यवसायांना वेळीच आळा घालून व्यसनमुक्त व अवैध व्यवसायमुक्त गाव बनवा, असे आवाहन स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारे रवि शिंदे यांनी केले.

निमीत्त होते भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे काल (दि.१८) ला आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाचे.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुदायिक प्रार्थना व भजने म्हणतो मात्र त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून गाव आदर्श बनविण्याचे विसरलो. ते आता नव्याने अंगीकारुन व्यसन व अवैध व्यवसाय हद्दपार करुन गाव चैतन्यमय व आदर्श करावे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा व गाव घडवावा.

यावेळी मुधोलीचे सरपंच बंडु नन्नावरे, आष्टाचे सरपंच चांगदेव रोडे, बाळकृष्ण पडवे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते दत्ता बोरेकर, बाळकृष्ण पडवे, केशव विरुटकर, सरपंच बंडू नन्नावरे, सरपंच चांगदेव रोडे, पवन महाडीक, प्रमोद खीरटकर, रमेश पडवे, प्रभाकर तेलंग, विलास पडवे, अश्विन हूलके, राजु पडवे, सुरेश बहिरे, बंडू कारमेंगे, शेखर वाढई, किशोर पडवे, लक्ष्मण पडवे, वासुदेव पडवे, दिवाकर शेंडे, सचिन कोटावार, दिनेश शेंडे, नरेश तूमडे, निखिल तिवाडे, धनराज रामगुंडे, संदीप कारमेंगे, विजु वैरागडे, सुभाष सोनुले, गोवर्धन पाटील, गवसका पठाण, किशोर पडवे आदी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.