“त्या” शावकाला सकाळी मिळाले “जीवदान” आणि रात्री मिळाली “आई”

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• पश्चिम चांदा वनप्रकल्पात त्या शावकाने केला आपल्या आई सोबत मुक्त विहार
• दाबगाव शेतशिवारातील विहिरीत पडला होता शावक घटना

चंद्रपूर : मूल तालुक्यातील दाबगाव शेतशिवारात विहिरीत पडलेल्या चार महिण्याच्या शावकास रेस्क्यू करून जीवदान दिल्यानंतर दुस-यास दिवशी आज गुरूवारी त्याला पश्चिम चांदा वन प्रकल्पातील वनात त्याच्या आईचा शोध घेण्यात आले. काल जीवदान मिळाले आणि आज आई मिळाल्याने वनविभागाचे अधिका-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुल तालुक्यातील दाबगाव येथे भाऊजी घोंगडे यांचे शेतातील विहीरीत चार साडेचार महिन्याचा शावक पडलेला होता. अतीशीघ्र कृतीदल चंद्रपुर व अतीशीध्र कृतीदल ताडोबाचे राजु बडकेलवार ,अजय मराठे व टीम यांनी विभागीय वनअधिकारी सारीका जगताप मैडम यांच्या मार्गदर्शनात रेस्क्यू करून त्या शावकास सुखरुप विहीरीतुन बाहेर काढले. त्यानंतर शावकाला चंद्रपुर येथील प्राणी उपचार केंद्रात नेवून पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुचे देखरेखी मध्ये उपचार करण्यात आले. दिवसभरात शावक ठा झाल्यानंतर वैद्यकीय विभागाने शावक स्वस्थ असल्याबाबत अभिप्राय दिला.

शावक चार महिण्याचा असल्याने या परिसरात शावकाची आई वाघीण असावी, असा अंदाज वनविभागाचे अधिका-यांना आला होता. त्यामुळे शावक आणि वाघीण यांची भेट घालून देण्याचे नियोजन करण्यात आले. चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रविण यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय वन अधिकारी , चंद्रपूर यांचे नेतृत्वात वाघीण शावकास पश्चिम चांदा वनप्रकल्पातील कक्ष क्रमांक 525 सिमेलगत पिंजऱ्यामध्ये काल रात्री 8.00 वाजता ठेवण्यात आले. रात्री 9.30 वाजता वाघीण शावकाचे पिंजऱ्याजवळ आली. शावक हंबरडा फोडू लागले. बरेच वेळ शावक आणि वाघीण यांच्यामधील हे दृश्य मन हेलावणारे होते. ही संपुर्ण परिस्थिती पाहताहे शावक त्याच वाघीणीचे असल्याचे निश्चीत झाल्याने दोरीच्या सहाय्याने पिंजऱ्याचे दार खोलून शावकास मुक्त करण्यात आले. शावक आणि वाघीण मातेचा मिलन झाल्याने शावकाला घेवून वाघीण निघून गेली.