• मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे मागणी
चंद्रपूर : कोविड ची बिकट परिस्थिती आहे रोज हजारो च्या संख्येने रुग्ण वाढत आहे आणि मृत्यू ची संख्या पण हजारो च्या संख्येत आहे. पण कोविड च्या रुग्णांशी सरळ संपर्कात डॉक्टर, नर्स, कर्मचारी व पोलिस यांचा येतो आहे हे सगळे आपल्या जीवाचा परिवाराचा विचार न करता नॉन स्टॉप २४ तास देत आहे त्या मुळे अनेक कोविड योद्धाना कोविड ची लागण होत आहे आणि त्यांची मृत्यू चे प्रमाण पण वाढत आहे.
अशीच एक दुर्देवी घटना आज चंद्रपूर मेडिकल कॉलेज मधील २४ वर्षीय तरुण कोविड योद्धा राहुल नान्ने हा शाहिद झाला. अश्या अनेक दुर्देवी घटना घडत आहे. पण या कोविड योद्धांच्या मृत्यू मुळे अनेक कुटुंब उघड्यावर येत आहे. पण आपले सरकार त्या कोविड योद्धांचे किंमत लावू शकत नाही पण त्यांच्या परिवाराला सहकार्य म्हणून दिल्ली च्या केजरीवाल सरकार प्रमाणे एक कोटीची सम्मान राशी महाराष्ट्र च्या शाहिद कोविड योद्धांच्या परिवाराला देण्यात यावी अशी मागणी मा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदन द्वारे करण्यात येत आहे.