पत्रकार गुरुदेव अलोने यांचे निधन

चंद्रपूर : ब्रम्हपुरी शहरातील क्रिष्णा काँलनी येथील रहिवासी असलेले एका प्रादेशिक वृत्तपत्राचे पत्रकार गुरुदेव अलोने (वय ४० वर्ष) यांचे कोरोना आजाराने उपचारादरम्यान ब्रम्हपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात दि. २३ एप्रिल ला सकाळी ११ वाजता च्या सुमारास दुर्दैवी निधन झाले.

गुरुदेव अलोने यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी व दोन मुले आहेत.