खासदारांच्या कामाचा श्रेय माजी केंद्रीय मंत्र्यांने घेऊ नये : घुग्घूस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू रेड्डी सवाल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. हि चिंतेची बाब आहे. महाविकास आघाडी सरकार मोठ्या प्रमाणात या गंभीर आपत्तीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे.
केंद्र सरकार मात्र बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. काम करतो एक आणि चमकोगिरी करतो एक अशी परिस्थिती दिसत आहे.या महामारीत राजकारण न करता काम केले पाहिजे. घुग्गुस येथील राजीव रतन हॉस्पिटल ताब्यात घेण्यासाठी मी स्वतः खासदार बाळू धानोरकर याना हि बाब सांगितली होती.

खासदार बाळू धानोरकर यांनी दि. १२-४-२०२१ ला मा. सीएमडी वेकोलि नागपूर यांचे सोबत भ्रमणध्वनी वेकोलिच्या सर्व क्षेत्रीय रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्याची सूचना करून पत्राचार देखील केला. त्यानुसार वेकोलि मुख्यालयातून त्याच दिवशी सकारात्मक उत्तर देखील खासदार महोदयांना प्राप्त झाले.

खासदार बाळू धानोरकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर घुग्गुस येथील राजीव रतन हॉस्पिटल कोरोना रुग्णांच्या सेवेत आलं. परंतु मागील काही वर्षात सतेत असतांना राजीव रत्न रुग्णालयाला केंद्रीय रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिला मात्र हा रुग्णालय केवळ शोभेची वास्तू झाली होती. मात्र आता त्या रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. हा केविलवाणा प्रकार त्यांनी थांबवावा असा सल्ला त्यांना रेड्डी यांनी दिला आहे.