गरीब रुग्णांसाठी रेमडीसीवीर इंजेक्शनसह इतर औषधी उपलब्ध करा :

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• आ. किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना पत्र

चंद्रपूर : चंद्रपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव अनियंत्रीत होत असतांना शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये रेमडीसीवीर इंजेक्शनसह इतर गरजेच्या औषधांचा तुटवडा निर्माण होणे चिंतेची बाब बसून यावर नियोजन करुन येथे उपचार घेत असलेल्या गोर गरीब रुग्णांसाठी सदर औषधसाधात तात्काळ मुबलक प्रमाणात उपलब्ध करा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या असून सदर विषयाबाबतचे पत्रही त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

चंद्रपूरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ नियत्रंणात आणण्याच्या दिशेने प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केल्या जात आहे. मात्र अद्यापतरी कोरोनाची साखळी पूर्णताह तुटलेले नाही. परिणामी दररोज हजारांच्यावर कोरोना रुग्ण चंद्रपूर जिल्हात आढळून येत आहे. याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर जाणवत असून दररोज उपचारा करीता रुग्णालयात दाखल होणा-यांची संख्याही अधिक आहे. गोर गरिग रुग्णांना खाजगी रुग्णालयातील उपचार न परवडण्यासारखा असल्याने ते शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे. मात्र शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या गंभिर रुग्णांसाठी आवश्यक असलेली रेमडीसीवीर इंजेक्शन व इतर औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहे. या औषधांचा साठा मोठ्या प्रमाणात चंद्रपूरात पोहचत आहे. तरी मात्र शासकीय रुग्णालयांमध्ये सदर औषधांचा तुटवडा निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे. त्यामूळे याकडे विशेष लक्ष देवून याबाबतचे उत्तम नियोजन करुन शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये मूबलक प्रमाणात सदर औषधसाठा उपलब्ध करण्यात यावा अशा सुचना पत्राच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आल्या आहे.