चंद्रपूर 838 कोरोनामुक्त तर 12 मृत्यू , 355 पॉझिटिव्ह

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 838 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 355 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 12 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 955 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 73 हजार 836 झाली आहे. सध्या 5 हजार 751 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 55 हजार 488 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 72 हजार 12 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 1368 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.