आंबे तोडायला गेलेला इसम वाघाच्या हल्ल्यात ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• मुल तालुक्यातील मारोडा शेतशिवारातील घटना

चंद्रपूर : रोजगार हमीच्या कामावर मुलगा आणि सुनेचा जेवनाचा डब्बा देऊन परत येत असताना आंबे तोडण्यासाठी गेलेल्या 68 वर्षीय शेतकऱ्यावर नहरालगत दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना मूल तालुक्यातील मारोडा गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील नहरालगत आज रविवारी (23 मे) ला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. मनोहर अडकुजी प्रधाने असे मृताचे नाव असून तो मारोडा येथील रहिवासी होता.

मुल तालुक्यातील मनोहर आडकुजी प्रधाने (६८) हा
मारोडा येथील निवासी होता. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर रोजगार हमीच्या माध्यमातून पांदन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामावर मृतकाचा मुलगा आणि सून कामावर गेले होते. त्या दोघांचाही जेवनाचा डब्बा देवुन साडे अकराच्या सुमारास त्याच परिसरातील नहरा लगतच्या झाडांचे आंबे तोडुन घराकडे परत येत असतांना नहरात दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याचेवर हल्ला करून जागीच ठार केले. मृतक हा दुपारी १२ वा. पर्यत घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता नहराच्या काठावर तो मृतावस्थेत आढळून आला. मृतकाचा पाय तोडलेला आणि गळा चिरलेला होता. यावरून त्याला वाघानेच ठार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेञाधिकारी जी.आर.नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनरक्षक उईके, पारधे आणि ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. वनविभागाने मृतक मनोहर प्रधाने यांच्या कुटूंबियास २५ हजार रूपयाची तातडीची मदत केली आहे.