केंद्रातील भाजप सरकार हे गोरगरिबांचे नसून मूठभर उद्योगपतींचे : खा. बाळू धानोरकर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या राखी महोत्सवाला सुरवात

चंद्रपूर : केंद्र सरकार सामान्य लोकांना महागाई चे चटके देत असून हे सरकार गरिबांचे नाही तर उद्योगपतींचे आहे, अशी टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली. प्रदेश महिला काँग्रेसच्या राखी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. आगामी काळात महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव राबवण्यात येत आहे. महिला काँग्रेस च्या पदाधिकारी सामान्य लोकांना राखी बांधून त्यांना ओवळणीत काँग्रेस ची साथ मागणार आहे.सामान्य नागरिकांना राखी बांधून महिला काँग्रेस च्या पदाधिकारी मोदी सरकारने लादलेल्या महागाई चे पत्रक नागरिकांना देणार आहे, त्याचे प्रकाशन देखील यावेळी खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतीय संस्कृतीत सणांचे अनन्य साधारण महत्व आहे. काँग्रेस पक्षाशी नागरिकांना जोडण्यासाठी सणांचा उपयोग केला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन या राखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाचे संचालन सेवादल महिला काँग्रेस च्या अध्यक्षा स्वाती त्रिवेदी यांनी केले. यावेळी सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खणके, सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी, अशोक मत्ते, महिला काँग्रेस च्या जिल्हाउपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, सेवा फाउंडेशन च्या शहर अध्यक्षा शितल काटकर, नगरसेविका संगीता भोयर, अनुसूचित महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा अनु दहेगावकर, शहर अध्यक्षा शालिनी भगत, उपाध्यक्षा सुनील पाटील, सेवा फाउंडेशन चे ग्रामीण अध्यक्ष हाजी अली,प्रिया ढोले, श्रद्धा परचाके, रसिका वाघाडे, शिरीन, समिस्ता फारुकी, वैशाली रायपुरे, सुनील चव्हाण, संदीप सीडाम, विनोद संकट, रामीज, राज यादव, सुष्मा बनसोड, माला माणिकपुरी,मंदाकिनी मडावी यांची उपस्थिती होती.