ब्रेकिंग : राजकीय संघर्ष ;  AAP व BRSP मध्ये फ्री स्टाईल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : मागील अनेक वर्षांच्या प्रतीक्षे नंतर औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.

आणि अनेकांचा राजकीय झंडू जागृत झाला दररोज या शहरात एक नवीन पक्ष उदयास येउ लागला या नवीन पक्षात “तू ‘ मोठा की ” मी”मोठा अशी प्रतिस्पर्धा शुरू झाली.

काही दिवसांपूर्वी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सोडून अनेक पदाधिकाऱ्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला, तेव्हा पासून अमराई वॉर्डातील बहादे प्लॉट येथील कचरा सफ़ाईला घेवुन दोन्ही पक्ष सतत राजकारण करीत होते. एकमेकांवर कुरघोडी करीत होते.

काल सांयकाळच्या सुमारास बहुजन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष शरद पाईकराव कार्यकर्ते सह आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अमित बोरकर यांना मारहाण केल्याची तक्रार अमित बोरकर यांनी पोलीस स्टेशनला दाखल केली असता पोलिसांना अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून प्रकरण मिटविले येणाऱ्या काळात अजून असे अनेक पक्ष उदयास येऊन राजकीय गणित बसविण्याचे प्रयत्न करतील व असे राजकीय संघर्ष नागरिकांचे करमणूक करतील हे नक्कीच