कोयला श्रमिक सभा (HMS) कामगार संघटनेत INTUC चे ज्येष्ठ नेत्यांचा प्रवेश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोयला श्रमिक सभेचे केंद्रीय अध्यक्ष JBCCI सदस्य श्री. शिवकुमार यादव, श्री. राजू उंबरकर (मनसे) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कोयला श्रमिक सभा सरचिटणीस नेतृत्वाखाली वेकोली वणी क्षेत्रातील मुंगोली उपक्षेत्राच्या इंटकच्या निष्ठावान कामगार नेत्यांनी एचएमएस कामगार संघटनेत प्रवेश केला.

एचएमएस कामगार संघटनेत गेल्याने इंटक युनियनला हादरा बसला आहे. यामुळे सदस्यता मोहिमेत मोठा फरक पडणार असल्याचे कामगार वर्गात बोलले जात आहे.

वेकोली वणी क्षेत्रातील मुगोली उपक्षेत्र इंटक युनियनचे ज्येष्ठ नेते, एरिया वेल्फेअर सदस्य अशोक लोणारे, इंटक एरिया टिएससी सदस्य कुर्लेवार, इंटक युनियन मुंगोली उपक्षेत्राचे सचिव शौकत अली, इंटक युनियनचे सातपुते आणि अन्य कार्यकर्त्यांनी कोयला श्रमिक सभेचे सदस्यत्व स्वीकारले.