चंद्रपूर : देशात “कोरोना” ने मरणवाटा मोकळ्या केल्या आहे.शासकीय ते अनेक स्तरावरील जागरूकतेने उपाययोजना केली जात आहे.मदतीचे अनेक हात सामोर येत आहेत.ज्या देहाला जिवंतपणी जगण्याचा आधार मानतो तोच प्रियजीव “कोरोना” मृत्यूनंतर स्पर्श करायलाही बंधन घालतंय. स्वकीयांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रुंचे पाट झिरपू-झिरपू थांबतात…उरतात त्या फक्त आठवणी!
कुणी येत नाही,कुणी स्पर्श करीत नाही. ती शेवटची आंघोळ नाही. दुःखाचा हंभरडा नाही. धायमोकलून रडणं नाही. ना आकटं ना खांदकरी मात्र जातीधर्माच्या पलीकडे माणुसकीचा. खांदा देऊन हजारो मृतदेहांना धर्मानुसार विधिवत अंत्यसंस्कार करणारे अब्दुल जब्बार अब्दुल सतार 22, शेख अहमद, शेख गुलाम 22, शेख अलिम शेख, इकबाल 23, आरिफ खान बशिर, खान 23 हे तरुण “कोरोना” च्या भीतीतही माणुसकीच्या प्रबळ इच्छाशक्तीने आज हजारो बांधवांवर अंत्यसंस्काराचे कार्य कोणत्याही प्रसिद्धी,फोटोविना पार पाडीत आहे. आज यवतमाळातील नागरिकांनी त्यांच्या कार्याला अक्षरश डोक्यावर घेतले आहे.