अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ पोलीस चौकी हद्दीतील चकदुगाळा येथील अंगणवाडी सेविका पदावर कार्यरत असलेल्या एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

शोभाताई लोमेश खोब्रागडे (25) असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर घटनेची माहिती बेंबाळ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शोभाताई या मधुमेह, रक्तदाब या आजाराने त्रस्त होत्या. यातून तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.