घुग्घुस हिंदू व बौद्ध समशान भूमी करिता खासदार निधितुन दोन – दोन शवदाहिनी मंजूर 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथील बौद्ध व हिंदू समशान भूमितील शवदाहिनी अत्यंत जर्जर अवस्थेत आली असून याठिकाणी नवीन शववहिनी बसविण्यात यावे अशी मागणी काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, घुग्घुस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, जिल्हा किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेते सैय्यद अनवर, यांच्यातर्फे खासदार बाळु भाऊ धानोरकर यांना मागणी करण्यात आली.

खासदार बाळु भाऊ धानोरकर यांनी सदर मागणी तातळीने मान्य करीत स्थानिक विकास निधीतून हिंदू व बौद्ध समशान भूमिला प्रत्येकी दोन – दोन शवदायिनी मंजूर करण्यात आली आहे.