दोन लहान भावांनी मोठ्या भावाला अंगावर डिझेल टाकून पेटविले

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

गडचांदूर (चंद्रपूर) : येथील मुक्तीधाम परिसरात दोन सख्या लहान भावांनी मोठया भावास डिझेल टाकून पेटविले.आरोपी नामे रवी उर्फ रोहिदास रामजी मूनेश्वर (38),अमृत रामजी मूनेश्वर (30) यांनी मोठा भाऊ जयदेव रामजी मूनेश्वर (46) याला कौटुंबिक वादातून पेट्रोल टाकून पेटविले. जखमी जयदेवला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सदर घटना आज रविवारी सकाळी 10 च्या दरम्यान घडली.

आज सकाळी लहान मुलावरून आरोपी व जयदेव च्या बायकांमध्ये वाद झाला.त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी जयदेव शेतातून आल्यावर त्याच्यावर डिझेल टाकून पेटविले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून कलम 307 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.