चंद्रपुरातील हृदयद्रावक घटना : मुलापाठोपाठ आईनेही घेतला अखेरचा श्वास

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• दोघांनाही झाली होती कोरोनाची लागन
• सफाई कर्मचारीच्या निधना नंतर मृतकाच्या कुटुंबीयांनाला एक कोटी देण्याची मागणी

चंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत सफाई कर्मचारी आणि त्याची आई या दोघांचाही चार दिवसात कोरोनामुळे निधन झाल्याची हदयद्रावक घटना चंद्रपुर शहरातील पंचशिल वार्डात घडली आहे. राहुल नन्हेट (वय 25) व आशाबाई नन्हेट असे मृतांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील मुलगा आणि आईचे निधन झाल्याने नन्हेट कुटूंबावर दु:खाचे सावट पसरले आहे.
मृतक मुलगा व आई चंद्रपूर शहराती होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात वडील हे कर्मचारी असताना त्यांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात पत्नी व दोन मुले व एक मुलगी असा परिवार होता. मुलीचे लग्न झाले ती आपल्या सासरी राहते. तिघांच्या कुटूबांत सर्व जबाबदारी ही आईवर होती. अखेर वडीलाच्या जागी स्वच्छता कर्मचारी म्हणून मोठ्या मुलाला नोकरी मिळाली. मागील दीड वर्षापासून तो सामान्य रूग्णालयात कोविड योद्धा म्हणून प्रामाणिकपणे काम करीत होता.

कोरोना पीडित रूग्नाच्या सेवा करत असताना त्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला. आणि 21 एप्रिलला त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आई आणि लहान मुलगा दोघेच कुटूंबात राहिले. कर्ता मुलाच्या मृत्यू आईला धक्काच बसला. त्यानंतर आईही पॉझिटीव्ह झाली. तिला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिस-या दिवशी काल शनिवारी 24 एप्रिल ला आईची तब्येत बिघडली. रात्रीच्या सुमारास आईनेही कोविड उपचार केंद्रात शेवटचा श्वास घेतला. चार दिवसांत एकाच कुटुंबातील आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने कोविड योध्द्याचे परिवारावर कोरोनामुळे दु:खाचे संकट कोसळले आहे. आता नन्हेट कुटूबांत लहान भाऊच एकटाच राहिला आहे. आई आणि भावाच्या प्रेमापासून त्यालाही कोरोना महामारीमुळे पोरके व्हावे लागले आहे.

आई व भाऊ मृत्यू पावलेल्या
नन्हेट कुटूंबाला आर्थिक मदतीची गरज

चंद्रपुरात कोरोना महामारी परिस्थिती दररोज खराब होत आहे. शेकडो बाधित होत आहे तर मृत्यूमुखी पडत असलेल्यांचा आकडाही मोठाच आहे. कोरोना पीडितांचा डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि पोलिसांशी थेट संबंध येत असतो. अशाही परिस्थितीत त्यांना तासन्तास सेवा द्याव्या लागतात. कोविड योध्दा राहुल हाही अशाच पध्दतीने बाधित झाला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

जिवाची पर्वा न करता सेवा देणा-या कोविड योध्दयांना अशा संकट समयी भरीव मदत करण्याची गरज आहे, राज्य शासनाकडून अद्याप पावेतो मदत मिळाली नाही.
दिल्ली सरकारने दिल्लीतील सफाई कर्मचारी च्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला एक कोटीची आर्थिक अतिरिक्त रक्कम दिल्ली होती, त्याच प्रमाणे महाराष्ट्रतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शुध्दा नन्हेट कुटुंबाला सुद्धा एक कोटी ची मदत करावी अशी मागणी करून भारतीय सुदर्शन समाज महासंघ चंद्रपूर यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.