आठ वर्षीय बालिकेला ट्रकने चिरडले;  माजी आमदार जव्हेरी यांच्या विदर्भ सिमेंट प्रोडक्ट कंपनीत अपघात

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : ताडाळी येथील जव्हेरी यांच्या विदर्भ सिमेंट प्रोडक्ट या कंपनीत आज सकाळी 10 च्या सुमारास कंपनीच्या ट्रकने एका आठ वर्षीय मुलीला ट्रकने चाका खाली चिगळले यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. चांदणी रामचंद्र कश्यब (वय 8) असे मुलीचे नाव आहे.

मृतक मुलीचे आई वडील (युपी) या राज्यातील आहे. ते चंद्रपूर येथील ताडाळी मध्ये असलेल्या माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांचा मुलाच्या विदर्भ सिमेंट प्रोडक्ट कंपनीत गेल्या पाच वर्षापासून काम करत असून ते आपल्या कुटुंबीयांसोबत कंपनीत राहतात. आज सकाळी आई वडील कंपनीत कामाला गेले असता मुलगी कंपनीतील घराच्या आवारात खेळत असताना विदर्भ सिमेंट प्रोडक्ट कंपनीचा MH-34 M3949 या क्रमांकाचा ट्रक तिचा अंगावरून गेला स्थानिकांनी मुलीला ताडाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले परंतु डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले.

त्यानंतर मृृत मुलीच्या नातेवाइकांनी व कंपनीतील कामगारांनी मृत देह विदर्भ सिमेंट प्रोडक्ट या कंपनीत नेला आणि नुकसानभरपाईची मागणी केली. घटनास्थळी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटना स्थळी पडोली पोलीस दाखल झाले. ट्रक ड्रायव्हर विरोधात गुणा दाखल केला असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.