चंद्रपूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच तीन विद्यार्थी UPSC परीक्षेत उत्तीर्ण

अंशूमन यादव २४२, आदित्य जिवने 399, देवव्रत मेश्राम 713 देशातून रँकने उत्तीर्ण

चंद्रपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेचा निकाल शुकवारी जाहीर झाला. यात UPSC सिव्हील सेवा परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच तीन विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहे यात जिल्ह्यातील मागास समजल्या जाणाऱ्या सावली येथील देवव्रत वसंत मेश्राम याने देशातून 713 वी रँक पटकावत सावलीकरांच्या कोतुकात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाने सर्वसामान्य कुटुंबातील व प्राथमिक शाळेतील विध्यार्थीही अथक परीश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्नाने UPSC परीक्षा उत्तीर्ण होता येऊ शकते हे दाखवून दिले.

तर वरोरा येथील आदित्यला करोना महामारीत कोविडची लागण झाल्यानंतर, सिटी स्कॅन स्कोअर १८ असतांना रूग्णालयात मृत्युशी झुंज देत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ३९९ व्या रँकने उत्तीर्ण होण्याची किमया वरोरा येथील आदित्य जिवने या युवकाने साधली आहे. आज आदित्य IAS होताच त्याचेवर सर्वस्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

अंशूमन यादव हा २४२ रँकने परीक्षा उत्तीर्ण 

चंद्रपूर येथील जटपूरा गेट येथे वास्तव्य असलेला व आता दिल्ली येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत अंशूमन यादव हा २४२ रँकने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. अंशुमनचे वडील वेकोली मध्ये कार्यरत आहे. त्याने यशाचे श्रेय आई, वडील व कुटूंबियांना दिले.