• चिखलगाव ते वरोरा रेल्वे गेट चार पदरी रस्ता
वणी : ज्या देशातील रस्ते चांगले तो देश वेगाने प्रगती पथावर जातो. हा ध्यास मनात बाळगून संपूर्ण देशात अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे जाळे निर्माण करणारे देशातील विकास पुरुष केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी रस्ते विकासासाठी महाराष्ट्राला जो भरीव निधी दिला त्यातील 106 कोटींचा निधी भाजपा आमदारांच्या मागणीवरून रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी जिल्ह्यात दिल्याने कोरोनाच्या संकटकाळात एक आनंदाची झुळूक आली आहे. यात वणी साठी आ. बोदकुरवार यांनी मागितलेले 25 कोटी रुपये सिमेंट रोड साठी मंजूर करण्यात आले आहे.
संपूर्ण देशात आपल्या कल्पकतेने विविध मोठमोठे प्रकल्प आखून ते कमी खर्चात व कमी कालावधीत पूर्ण करण्यात ना. गडकरी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
वणी शहराला दोन हजार चारशे अठ्ठावन लाख रुपये चिखलगाव रेल्वे गेटपासून बस स्टॉप- टिळक चौक ते वरोरा रेल्वे गेट पर्यंत चार पदरी सिमेंट रोड, रस्त्याच्या बाजूला मोठ्या नाल्या व प्रकाशासाठी रस्त्यावर दिवे यातून लावल्या जाणार आहे. या कामामुळे वणी शहराचा चेहरा- मोहरा बदलून जाणार आहे. आ. बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे केंद्र शासनाकडून भरीव निधी प्राप्त झाला आहे.