राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री चंद्रपुरात येण्या अगोदरच डेरा आंदोलकांचा “Go – Back” चा नारा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• आधी कोविड योध्द्यांचे पगार द्या, मगच जिल्ह्यात या
• वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख
उद्या चंद्रपूरात

चंद्रपूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख उद्या मंगळवार दि. 27 एप्रिल 2021 रोजी, सकाळी 9.00 वाजता चंद्रपूरला येत आहेत. मात्र ते येण्या अगोदरच थकीत पगारासाठी मागील ७८ दिवसांपासून मुलं-बाळ व कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत असलेल्या डेरा आंदोलकांनी गोष्ट “बॅक” चा नारा दिला आहे.

दर महिन्याला नियमीत पगार मिळणे कायद्यानुसार कामगारांचा हक्क असताना अधिकाऱ्यांच्या भोंगळ व भ्रष्ट कारभारामुळे कामगारांना पगार मिळू शकले नाही. या विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. तात्याराव लहाने,चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सर्व अधिकारी शासनाची दिशाभूल करीत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री अमित देशमुख कोविड योद्ध्यांच्या उपासमारीशी काहीही घेणे-देणे नसल्यासारखे वागत आहेत. अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक राहिलेला नाही.थकीत पगारामुळे दोन कामगारांचा मृत्यू झालेला असतानाही कामगारांना थकीत पगार मिळत नसेल,तर या विभागाच्या मंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्यात येण्याचा हक्क नाही.

मंत्री अमित देशमुख यांनी आधी कोविड योध्द्यांचे थकीत पगार द्यावे आणि नंतरच चंद्रपूर जिल्ह्यातील पाय ठेवावा.अन्यथा त्यांना जिल्ह्यातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिलेला आहे.
कोरोना आपत्तीला एक वर्ष पूर्ण झाले. या अवधीत चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे तीन तेरा वाजले. अधिष्‍ठाता यांच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे जनतेमध्ये मोठा रोष आहे. वर्षभरामध्ये देशमुख यांनी राज्यातील एकाही वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिल्याचे माहितीस आलेले नाही.एक वर्षानंतर अमित देशमुख कोरोना आपत्तीचा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी राज्याचा किंवा चंद्रपूर जिल्ह्याचा दौऱ्यावर निघाले का ? की कोरोनामुळे नाहक बळी गेलेल्या नागरिकांच्या मृत्यूंचे उत्सव साजरे करण्यासाठी ते चंद्रपूर जिल्ह्यात येत आहेत ? असा संतप्त सवाल नगरसेवक देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे.

मागील आठ दिवसांपासून चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आरोग्य विभागात काम करणाऱ्या सुमारे पाचसे कर्मचाऱ्यांनी थकित पगारा करिता डेरा टाकून आंदोलन सुरू केले आहे, मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल आजपर्यंत ना शासन आणि शाळेत प्रशासनाने घेतली आह. कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येऊन आपला हक्क मागावे लागत आहे. वारंवार राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे आपल्या न्यायीक मागण्यांबाबत निवेदने सादर केलीत, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे उद्या 27 एप्रिल ला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना आंदोलकांच्या रोषाला पुढे जावे लागणार असल्याचे आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेले जन विकास सेनेचे अध्यक्ष देशमुख यांचे म्हणणे आहे.