चंद्रपूर : जिल्हात कोरोना टेस्टिंगची गती वाढविण्यात आली आहे. त्यामूळे शासकीय तपासणी केंद्रांवर मोठा ताण निर्माण झाला असून आरटीपीसीआर तपासणीचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत आहे. तसेच कोरोना तपासणी केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असल्याने येथील व्यवस्था कोलमडत आहे. त्यामूळे तपासणीसाठी जात असलेल्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी रुग्णालयांमध्येही आरटीपीसीआर तपासणी तात्काळ सुरु करण्यात यावी अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या आहे.
चंद्रपूरात कोरोनाचे वाढते संक्रमन लक्षात घेता कोरोनाच्या तपासण्या वाढविण्यात आल्या आहे. त्यामूळे शासकीय कोरोना तपासणी केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत कोरोनाचे संक्रमन वाढण्याचीही शक्यता अधिक आहे. तसेच या केंद्रावर मोठा ताण निर्माण होत असल्याने नागरिकांचीही चांगलीच गैरसोय होत आहे.
एका केंद्रावर एका दिवशी शेकडो नागरिकांची तपासणी होत असल्याने याचा परिणाम अहवाल मिळण्याच्या गतीवर होतांना दिसून येत आहे. परिणामी आरटीपीसीआर तपासणीच्या अहवालासाठी नागरिकांना 24 तासांहून अधिक काळ प्रतिक्षा करावी लागत आहे. या दरम्याण अनेक रुग्णांची प्रकृतीही खालावल्याचे प्रकारही समोर आले आहे. त्यामूळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांना योग्यवेळी उपचार मिळावा याकरिता आरटीपीसीआर तपासणी करिता खाजगी रुग्णालयांना तात्काळ परवाणगी देण्यात यावी अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहे.