वणी :‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्ह्यात दिनांक 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर विहित मुदतीत दुकाने व आस्थापना बंद करण्याचे आदेशीत असताना शहरात विनाकारण भटकंती करणारे काही महाभाग आहेत. त्यांचेवर जरब बसावी याकरिता प्रशासनाने त्वरित कारवाईचा बडगा उगारत “अँटिजेंन टेस्ट” केल्याने टवाळखोरांचे धाबे दणाणले आहे.
राज्यात कोरोना विषाणुमुळे उदभवणा-या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामूळे जिल्हयात रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेंची दुकाने दि. 21 एप्रिल ते दिनांक 1 मे, पर्यंत सकाळी 7 वाजता पासून 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत आदेशीत केले आहे. तसेच सदर कालावधीत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु विहित मुदती नंतर सुद्धा अनेक युवक व नागरिक शहरातील मार्गावरून भटकंती करताना दिसत आहे. तर काही टवाळखोर दुचाकी वरून भ्रमंती करतात याला आळा बसावा याकरिता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत “अँटिजेंन टेस्ट” करण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी 29 व्यक्तीची चाचणी करण्यात आली असून 1 व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला आहे.
शनिवारी 11 वाजता नंतर येथील टिळक चौकात ठाणेदार वैभव जाधव, नायब तहसीलदार विवेक पांडे,अशोक ब्राम्हणवाडे व पोउनि गोपाल जाधव, महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.