उद्या कोरपना तालुका काॅग्रेस कमेटीच्या वतीने कोरपणा बंद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे पारीत करून देशाच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने संपूर्ण भारतात उद्या दिनांक 27 सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा जाहीर पाठिंबा असून कोरपना शहरात उद्या बंद ठेवण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाने केले आहे.

मा.आमदार. सुभाष भाऊ धोटे. श्री.विजयराव बावणे संचालक जि. बँक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा येणार आहे. उद्या कोरपना बंद ठेवून नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी उद्या सकाळी ठिक नऊ वाजता बसथानक‌ कोरपना येथे मोठया संख्येने उपस्थित राहून भारत बंद यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन काँग्रेसचे उत्तम पेचे जि. परीषद माजी सभा पा. कोवे कोरपणा न।प.मा.उपाध्यक्ष मनोहरभाऊ चन्ने. कोरपणा शहर अध्यक्ष सुनिलभाऊ बावणे ,युवक अध्य ईस्माईल भाई ,अल्प संख्यांक अध्यक्ष निसार भाई यांनी केले आहे.