• आमदार जोरगेवार यांची घुग्घूस नगर परिषदेला भेट
• नागरिकांच्या समस्या घेतल्या ऐकूण
• समस्या निकालात काढण्यासाठी प्रशासकासोबत चर्चा
चंद्रपूर : घुग्घूस येथील आ मराई वार्डातीलप्रभाग क्रमांक 1 मधील सुमारे दीडशे कुटुंब घरास्थायी पट्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार, तहसीलदारआणि नगर परिषद प्रशासनाला आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष आमित बोरकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होत. या मागणीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शनिवारी (२७ फेब्रुवारी २०११) ला घुुुग्घुस येथे भेट दिली. आमराई वार्डातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांना पट्टे देण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने कार्यवाही करावी असे निर्दश नगर परिषद प्रशासकांना दिले.
घुुुग्घुस येथे आमराई वार्डात सत्तर ते ऐंशी वर्षापासून नागरिक राहत आहेत,परंतु त्यांना घराचे स्थायी पट्टे
मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे सुमारे दीडशे कुटुंब घर जाण्याच्या भितीत जीवन जगतात. या बाबत जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. स्थानिक आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर यांनी, चंद्रपूरचे आमदार जोरगेवार,तहसीलदार आणि नगर परिषद प्रशासकांना पत्र लिहून स्थायी पट्टी देण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे. आज शनिवारी त्यांनी घुग्घूस येथे भेट दिली. आमराइ वार्डात नागरिकांशी संवाद साधला आणि विविध समस्यांची पहाणी केली. त्यामुळे नागरिकांना स्थायी पट्टे देण्याची गरज असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तेव्हाची ग्रामपंचायत आणि आताची नगर परिषद असलेल्या नगर परिषदेच्या प्रशासकांसोबत आमदारांनी चर्चा करून आमराई वार्डातील नागरिकांना स्थायी पट्टी देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिले.
आमदारांच्या या पुढाकाराने अनेक वर्षापासून वंचित असलेल्या सुमारे दीडशे कुटुंबीयांना स्थायी पट्टे मिळेल अशी आशा पल्लवित झाली आहे.