चंद्रपूर जिल्हयातील सलुन, स्पा, ब्युटीपार्लर,आता दर सोमवारी बंद -जिल्हाधिकारी यांचे आदेश

0
223
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोना पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्हयातील सलुन, स्पा, बार्बर शॉप, ब्युटीपार्लर, केस कर्तनालय इ. दुकाने व आस्थापना आता दर सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी जिल्ह्यातील सर्व सलुन/पार्लर सप्ताहातील एक दिवस पुर्णत: बंद ठेऊन, दुकान/आस्थापना व त्यातील सर्व साहित्यांची साफसफाई करुन निर्जंतुकीकरण करण्याकरिता जिल्हा प्रशासनास याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यास विंनती केलेली होती. सदर विनंती ही कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोणातून योग्य
वाटत असल्याने जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी वरील आदेश दिले आहेत.

सदर निर्देशाचे पालन न केल्यास संबंधितांवर
साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तसेच भारतीय दंड संहिता मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद केले आहे.