वैद्यकीय शिक्षण मंत्र्यापुढेच लागले “गो बॅकचे” नारे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• डेरा आंदोलनातील महिला कर्मचाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक
…अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी आटोपती घेतली बैठक

चंद्रपूर : मागील तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उभारलेल्या डेरा आंदोलकांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या भावनांचा आज मंगळवारी पुन्हा एकदा संतप्त उद्रेक पहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख याच्या पुढेच सात महिण्याच्या थकीत पगाराची मागणी करण्यात आली. यावेळी महिला आंदोलक ढसाढसा रडायला लागल्या. मंत्री महोदयांच्या पुढे गो बॅकचे नारे लावण्यात आले. त्यामुळे मंत्र्यांना पत्रकार परिषद आटोपती घ्यावी लागली. शेवटी देशमुख यांना घेराव करण्यात आल्याचा प्रसंग आज मंगळवारी चंद्रपुरात पहायला मिळाला.

आज मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील नियोजन भवन येथे अमित देशमुख यांची पत्रकार परिषद सुरू असताना मागील बाकावर बसलेल्या तीन कोविड योध्द्या महिला कामगारांनी थकीत पगाराबाबत मंत्री देशमुख यांना विचारणा केली. यावर त्यांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने महिला कामगार चांगल्याच संतापल्या. महिला कामगार थकित पगारासाठी ढसाढसा रडायला लागल्या. कामगारांचा उद्रेक पाहून अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि त्यांचे सोबत असलेले पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे सह आंदोलकांचा रौद्ररूप पाहून नियोजन भवनातून पत्रकार परिषद आटोपती घेतली.
नियोजन भवनातून बाहेर निघत असताना कंत्राटी कामगारांनी अमित देशमुख यांना घेराव केला.
गो-बॅक अमित देशमुख,’थकीत पगार द्या,मगच जिल्ह्यात या,असे नारे लावण्यात आले. चिघळत चाललेली परिस्थिती बघता वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी पोलिसांच्या सुरक्षेमध्ये काढता पाय घेतला.

कालच डेरा आंदोलकांना वैद्यकीय शिक्षण मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळाली होती. जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी ‘गो-बॅक’ अमित देशमुख चा नारा दिला होता.’आधी कोविड योध्द्यांचे थकित पगार द्या, मगच चंद्रपूर जिल्ह्यात या’ असा इशारा दिला होता. त्यानंतर आज पोलिस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पप्पू देशमुख यांच्यामागे सुद्धा काल रात्रीपासून पोलिसांच्या गुप्तचर विभागाचा ससेमिरा लागला होता. चंद्रपूरात आगमण झाल्यानजर कोविड परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर वेगवेगळ्या बैठका करून जिल्ह्याची कोरोना बाबतचीच परस्थिती मांडण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना डेरा आंदोलकांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्रकार परिषदेच्या ठिकाणी गाठले.
आणि आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तीन महिन्यापासून आंदोलन करीत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. परंतु वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना घेराव घालण्यात आले. गोबॅकचे नारे लावण्यात आले. जोपर्यंत थकित पगार व किमान वेतन लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा डेरा आंदोलकांनी दिला आहे.