पत्रकाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी ; तिघांवर गुन्हे दाखल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथील आंबोली क्षेत्राचे ‘दैनिक सकाळ’ प्रतिनिधी राजेंद्र जाधव यांना गावातील तिघांनी मारहाण केली. याप्रकरणाची तक्रार पोलिसांत करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

भिसी- शंकरपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली काम करण्यात आले. त्या नालीवर पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. मनमर्जनि हे पाईप टाकण्यात आल.काहींनी पाईप स्वतःच्या शेतासमोर टाकले. यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. याच मुद्द्यावर राजेंद्र जाधव यांनी कंत्राटदाराशी चर्चा केली. सुपरवायझर आकाळशल कलंत्री याच्यासोबत जाधव कामाच्या ठिकाणी गेले. तेव्हाच चर्चा सुरू असतानाच गोलू बल्की, मिलिंद बल्की, मंगेश बल्की यांनी राजेंद्र जाधव यांना अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली.

यात राजेंद्र जाधव यांचे कान, हाताला जबर मार लागला. जाधव यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. पोलिसांनी मिलिंद बल्की, गोलू बल्की, मंगेश बल्की यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.