भाजपा चे जेष्ठ नेते किशोर होकम यांचे अकाली निधन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथील प्रतिष्ठित नागरिक व व्यावसायिक तसेच  भाजप चे जेष्ठ नेते किशोर होकम यांचे दि 28 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता च्या सुमारास दुःखद निधन झाल्याचे कळते.

विठ्ठल मंदिर जवळील राहत्या घरीच त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी आपला अंतिम श्वास घेतला. संध्याकाळ च्या सुमारास त्यांचेवर घुग्घुस येथील शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे चंद्रपूर येथील डॉक्टर ची सेवा घेत होते.

त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी व तीन मुले असून सर्वत्र घुग्घुस परिसरात त्यांच्या अकाली मृत्यू मुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.