आमच्या विदर्भातील रुग्णांना वाजवी दरात उत्तम उपचार दया : आमदार किशोर जोरगेवार यांची तेलगांणातील आरोग्यमंत्री यांना विनंती

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• दुरध्वनीवरुन चर्चा, उपचाराचे दर निर्धारीत करण्याची केली विनंती

चंद्रपूर : विदर्भासह चंद्रपूरातील कोरोना रुग्ण उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने लगतच्या तेलंगाणा राज्यात जात आहे. अशात येथील खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट केल्याच्या तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांना प्राप्त होताच आ. जोरगेवार यांनी तेलंगाणाचे आरोग्यमंत्री इटेला राजेंडर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली असून तेथील खाजगी रुग्णालयात कोरोना उपचार संबधिचे दर निर्धारित करुन विदर्भातील रुग्णांना वाजवी दरात उत्तम उपचार देण्याची विनंती केली आहे.

तसेच तेथील शासकीय रुग्णालयात बेड, व्हेेेंटीलेटर, आॅक्सिजन आणि औषधसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावा अशी विनंतीही आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली आहे. आ. किशोर जोरगेवार यांच्या विनती नंतर ना. इटेला राजेंडर यांनीही याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आशवस्त केेले आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमाण घातला आहे. विदर्भासह चंद्रपूरातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. त्यामूळे परिस्थिती अनियंत्रीत होतांना दिसून येत आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शक सुचना केल्या जात आहे. तसेच आमदार किशोर जोरगेवार स्वता परिस्थितीवर लक्ष ठेवून असून येथील बेडसंख्या वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे.

असे असले तरी बेड अभावी अनेक रुग्ण उपचारा करिता तेलंगाणा राज्यातील करिम नगर, आसिफाबाद, मंचेरियाल येथे दाखल होत आहे. मात्र येथील काही रुग्णालयांकडून अवाढव्य दर आकारत रुग्णांची आर्थिक लूट केल्या जात आहे. त्यामूळे आज आमदार किशोर जोरगेवार यांनी तेलंगाणा राज्याचे आरोग्य मंत्री इटेला राजेंडर यांच्यासोबत दूरध्वनीवरुन चर्चा करत त्यांना परिस्थिबाबत अवगत केले आहे.

तेलंगाणा येथे उपचार घेत असलेल्या विदर्भातील रुग्णांना तेथील शासकीय रुग्णालयात योग्य सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, रुग्णांना योग्य वागणूक देण्यात यावी, खाजगी रुग्णालयांकडून होत असलेली रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यात यावी, रुग्णांच्या नातगांची योग्य व्यवस्था करण्यात यावी, खाजगी रुग्णालयातील दर निर्गमीत करण्यात यावे, अशी विनंती यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. इटेला राजेंडर यांना केली आहे. याच बरोबर अश्या कठीण काळत रुग्णांची मदत करत असल्या बदल त्यांचे धन्यवादही व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे तेलंगाणा, आंध्र प्रदेश येथील अनेक नागरिक चंद्रपूरात वास्तव्यास आहे. त्यामूळे चंद्रपूरचे या राज्यांसह रोटी आणि बेटी चे संबध राहिले आहे. त्यामूळे अशा कठीण काळात सदर राज्यांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.