घुग्घुस येथे 3 कोटीचा दारू साठा नष्ट

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

2017-20 या तीन वर्षातील 338 कारवाईतील जप्त दारुसाठ्यावर चालविले बुलडोझर

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी होऊन 6 वर्ष झाली आहे घुग्घुस येथे सन 2017-2020 या तीन वर्षाच्या कालावधितील घुग्गुस पोलिसांनी केलेल्या एकूण 388 कारवाईत जप्त करण्यात आलेली 3 कोटींची अवैध दारू आज चंद्रपूर न्यायालयाचे आदेशान्वये बुलडोझर चालवून नष्ट करण्यात आली आहे .

चंद्रपूर जिल्हा दारुबंदीनंतर अवैध दारू तस्करीचे प्रमाण व अवैध विक्रीचे प्रमाण वाढले होते त्यामुळे पोलिसांवर ताण वाढला पोलिसांनी आपले कर्तव्य बजावीत कारवाई करीत मागील 3 वर्षात घुग्घुस पोलिसांनी जप्त केलेल्या 338 गुन्ह्यातील 3 कोटींचा अवैध दारू आज चंद्रपूर न्यायालयाच्या आदेशाने शेणगाव येथील गुप्ता कोल वॉशरी जवळ अवैध दारूवर पोलिसांनी बुलडोझर चालवून नष्ट केली.

या वर्षीच्या कारवाईतील जप्त अवैध दारू संदर्भात न्यायालयाचा आदेश प्रस्तावित असून आदेश मिळाल्यावर ती दारू सुद्धा नष्ट करण्यात येणार आहे.
यावेळी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस उपस्थिती होते.