चंद्रपूर : कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील बिबी येथील विद्युत खांबावर काम करताना विजेच्या धक्क्याने ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला.ही घटना स्मार्ट ग्राम म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या बीबी या गावी आज शुक्रवारी 28मे 2021 ला घडली. विजेचा धक्का बसल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा मृतदेह जवळपास साढे तीन तास विद्युत खांबावरच लटकत होता. मारोती घोडाम ( ३० वर्ष) असे मृत कर्मचाऱ्याचे नांव आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बीबी यागावी आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान ग्राम पंचायत कर्मचारी विद्युत खांबावर काम करत होता. मात्र, त्याचवेळी विद्युत तारेमध्ये करंट आला आणि काही कळण्याच्या आत विजेचा धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा तारेवरच मृत्यू झाला.
मृत कर्मचाऱ्याचे नांव मारोती घोडाम वय ३० वर्ष असून मारोती नेतामगुडा चा राहणारा होता. मृतक हा ग्राम पंचायत कार्यालयात चपराशी म्हणून कार्यरत होता. सायंकाळी ६.३० च्या दरम्यान मृतकाचे शव पोल वरून खाली उतरविण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दरम्यान, या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा खरच एकदा ऐरणीवर आला आहे. विजेच्या खांबावर अन्य कोणीही चढू नये, असा वीज वितरण कंपनीचा नियम आहे .तरी देखील मात्र या नियमाचे घटनास्थळी उल्लंघन झाल्याचे दिसून येते आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण. असा ही प्रश्न येथील नागरिकांनी चर्चा दरम्यान उपस्थित केला आहे.