घुग्घुस – महातारदेवी जडवाहना विरोधात उद्या काँग्रेसचा रास्ता रोको

घुग्घुस : शहरात वेकोलीतुन कोळसा वाहतूक करणाऱ्या जडवाहनामूळे धूळ प्रदूषण व अपघाताने नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.

एसीसी ते घुग्घुस या रस्त्यावर प्रचंड धूळ असते तर घुग्घुस ते महातारदेवी रस्त्यावर कोळश्याच्या जडवाहनामुळे जागोजागी मोठे- मोठे खड्डे पडले असून धूळ व प्रदूषनाने रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे.

तसेच परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात धुळामुळे ग्राहक येणे ही बंद झाले आहे. समस्याग्रस्त नागरिकांच्या मागणी खातर घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता राजीव रतन चौक परिसरात सदर आंदोलन करण्यात येणार आहे.