
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा भव्य सत्कार
घुग्घुस : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. जयंत दादा पाटील यांचे घुग्घुस घुग्घुस नगरीत प्रथम आगमन झाले.
त्यांच्या सोबत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्षा सौ. बेबी ताई उईके,
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगांवकर, मुनाज शेख, फैय्याज शेख यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे दिलीप पित्तलवार यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची भव्य आतिषबाजी व
शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन ओवाळणी करून स्वागत करण्यात आले.
यावेळेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे समस्या जाणून घेतल्या तसेच महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या नेते व मंत्री यांच्या अथक परिश्रमाने घुग्घुसला नगरपरिषदचा दर्जा मिळवून दिले आहे.
येत्या काही महिन्यांत घुग्घुस नगरपरिषदची निवडणूक होत आहे. कार्यकर्त्यांनी निवडणूकी करिता पूर्ण ताकदीने तैयारीला लागावे
राज्यात महाविकास आघाडीचे शासन असून जनतेच्या समस्या समजून जनतेप्रती समर्पित व्हावे असे आवाहन केले.
यावेळेस राष्ट्रवादीचे भाणेश शेट्टी तालुका उपाध्यक्ष, राजू पुनघंटी, दिनेश मेश्राम, साहिल सैय्यद, देव भंडारी, विकी जंगम, विणेश आगदारी, रोशन आवळे, दीपक वर्मा, ताजु शेख, गिरीश कांबळे, अविनाश मेश्राम, शंकर मेश्राम, अमित सावरकर,सागर रामटेके, विनोद रामटेके, संदीप चिवंडे, सोनू बलकी, सचिन दासरी व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.