घुग्घुस : कोरोना महामारी पासून संरक्षणासाठी कोरोना लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना लसीकरणा बाबत जागृती करीता नगरपरिषद प्रशासक निलेश गौड यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती.
यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी घुग्घुस येथे लसीकरण केंद्र देण्याची एकमुखी मागणी केली होती. त्याची दखल घेत जिल्हापरिषद शाळे मध्ये नवीन लसीकरण केंद्र शुरू करण्यात आले. मात्र याठिकाणी लसीकरणाला येणाऱ्या नागरिकांना उन्हात तासनतास उभे राहावे लागत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यापासून ही वंचित रहावे लागत आहे.
नागरिकांना उन्हापासून संरक्षणा करिता आच्छादन (मंडप) तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी घुग्घुस शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी नगरपरिषद प्रशासक निलेश गौड यांना केली आहे. यासोबतच याठिकाणी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ही ठेवल्या जात नसल्याने लसीकरणाला येणारे नागरिक कोरोना बाधीत होण्याचा गंभीर धोका ही निर्माण होत आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी ही रेड्डी यांनी केली आहे.