• रुग्णालयात 100 ऑक्सिजन युक्त 100 बेडची होणार सुविधा
• आमदार किशोर जोरगेवार यांचा पुढाकार, कामाची केली पाहणी
चंद्रपूर : 100 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी आमदार विकास निधितून चंद्रपूर महानगर पालिकेला एक करोड रुपये हस्तांतरीत केले होते. तसेच सदर रुग्णालयासाठी जिल्हातील उद्योगांनी त्यांच्या कडे असलेला सामाजीक दायित्व निधी देण्याचे आवाहण केले होते. त्यानंतर आता आमदार किशोर जोरगेवार यांच्या एक करोड रुपयांच्या निधीसह उदयोगांच्या सामाजीक दायित्व निधीतून वन अकादमी येथे 100 बेड च्या ऑक्सिजन युक्त कोविड रुग्णालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांसह जाऊन या कामाची पाहणी केली असून काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना केल्या आहेत.
यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते. नोडल ऑफिसर रोहन घुगे, आरोग्य अधिकारी अविष्कार खंडारे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी आदिंची उपस्थिती होती.
कोरोनाग्रस्त रुग्णांची गैरसोय टाळत त्यांना योग्य उपचार देता यावा याकरिता महानगर पालिकेने सर्व सोई सुविधायुक्त 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या होत्या. या करिता आमदार किशोर जोरगेवार यांनी आमदार विकास निधीतील एक करोड रुपयांचा निधी मनपा प्रशासनाकडे वढता केला होता.
या कोविड रुग्णालयासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील उदयोगांनी पुढाकार घेत सामाजीक दायित्व निधी देण्याचे आवाहण केले होते. त्यांच्या आवाहणाला अनेक उदयोगांनी साथ देत सदर कोविड रुग्णालयासाठी त्यांच्याकडे असलेला सामाजीक दायित्व निधी देण्याचे मान्य केले आहे.
त्यामूळे आता वन अकादमी येथे सदर रुग्णालयाचे काम सुरु करण्यात आले आहे. रुग्णालय सुरु होणार असलेल्या वन अकादमी येथील इमारतीतील अनेक कामे पूर्ण झालेली नाही. त्यामूळे हे कामे पूर्ण करण्याच्या दिशेने युध्दपातळीवर प्रयत्न केल्या जात आहे. येथील लाईट फिटींग, ऑक्सिजन पूरवठा यासाह इतर महत्वाचे कामे सध्या सुरु असून येत्या काही दिवसातच हे रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सुरु केल्या जाणार आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी या कामाची पाहणी करत आढावा घेतला. येथील उर्वरीत कामे लवकर पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्यात.