गडचांदूर : कोरोना चे सावट अजूनही गेले नाहीत तेव्हा पोळा, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी हे सण अतिशय साधेपणाने, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत साजरे करावे, असे आवाहन नवनियुक्त पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी शनिवारी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटी च्या सभेत केले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने 4 फूट व घरगुती साठी 2 फूट उंचीची मूर्ती स्थापन करावी, मिरवणूक काढण्यास व DJ ला यावर्षी सुद्धा बंदी असून कार्यक्रम स्थळी गर्दी होणार नाहीत याची काळजी मंडळांनी घ्यावी असे आवाहन केले, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ व्हायरल करून शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सुध्दा सांगितले.
याप्रसंगी शांतता कमिटी चे सदस्य हंसराज चौधरी, मनोज भोजेकर, माजी न.प उपाध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, विक्रम येरणे,रामसेवक मोरे,रोहन काकडे,रोहित शिंगाडे, महेंद्र ताकसांडे, विठ्ठलराव थिपे,तथा पत्रकार, नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते, विविध गणेशोत्सव मंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते, सभेच्या आयोजनासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी,धर्मराज मुंढे,सुषमा आडकीने तथा इतरांनी सहकार्य केले,
,,फोटो,,