चंद्रपूर महिला काँग्रेसने एक हजार नागरिकांना राखी बांधून केली महागाईवर चर्चा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या माध्यमातून राखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी या महोत्सवाचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सलग सहा दिवस चौका चौकात, लहान हॉटेलस, बाजार, फुटपाथ, चहाची टपरी इत्यादी ठिकाणी सामान्य नागरिकांना महिला कांग्रेस च्या पदधिकारयानी राख्या बांधून ओवाळणी त कॉंग्रेस ची साथ मागीतिली.

महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव राबावण्यात आला. यावेळी सामान्य नागरिकांशी चर्चा करून त्यांना महागाई विरोधी पत्रक देण्यात आले. १००० नागरिकांना महिला काँग्रेस ने या राखी महोत्सवाच्या माध्यमातून राख्या बांधून प्रत्येकाशी वाढत्या महागाई वर चर्चा केली. या महोत्सवाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नागरीकांकडून मिळाला.

या महोत्सवाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नागरीकांकडून मिळाला. आज या उत्सवाचा समारोप बस स्थानक चंद्रपूर आणि एस.टी. वर्क शॉप चौकात करण्यात आला. या सर्व महोत्सवात प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, सेवा फाउंडेशन च्या शहर अध्यक्षा शीतल काटकर, सेवादल महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्षा लता बारापात्रे, किरण वानखेडे, समिस्ता फारुकी, परवीन सय्यद, मंगला शिवरकर, मंजू झाडे यांची उपस्थिती होती.