उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक संपन्न

विद्यापीठ स्तरीय विविध मागण्यांवर चर्चा

चंद्रपुर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिका-यांची आज (दि.२८) ला नागपुर येथे बैठक पार पडली.

या बैठकीत आमदार अभिजित वंजारी, आ. आशिष जैयस्वाल, प्रमोद मानमोडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, प्राचार्य फोरमचे डॉ. कोकोडे, अनिल पाटील, म्हशाखेत्री, संस्था चालक संघटनेचे राजु मुनघाटे, प्रा अनिल शिंदे, राजकुमार घुले, शरद वानखेडे, प्रा. शरयू तायवाडे, प्रा. गणेश झाडे, प्रा. राजू गोसाई, प्राचार्य फोरम गोंडवाना विद्यापीठ, प्राध्यापक संघटना व शिक्षक तथा शिक्षकेत्तर संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत महाराष्ट्र राज्यात प्राध्यापक संवर्ग कायदा २०१९ लागु करण्यात यावा, महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरतीकरीता असलेल्या १०० बिंदू नामावलीत ओबीसी आर्थीक दृष्टया दुर्बल घटक या संवर्गातील अन्याय दुर करण्यात यावा, तासिका तत्वावर नेमण्यात येणा-या प्राध्यापक पदासाठी लादण्यात आलेली नेट, सेट, पीएचडी ची अर्हता रद्द करण्यात यावी, दरवर्षी महाराष्ट्र शासनाद्वारे होत असलेली बी.एड. बी.पी.एड. एम.एड. व एम.पी.एड. महाविद्यालयांची चौकशी बंद करण्यात यावी, सीईटी व कॅप मार्फत होणारी प्रवेश पध्दती बंद करावी, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयातून निवृत्त प्राध्यापकांना विनाअनुदानित महाविद्यालयात ५% वेतनेत्तर अनुदान मंजूर करावी, विना अनुदानित पदव्युत्तर अभ्यासक्रमात १५% व्यवस्थापन कोटा मिळावा, दि. २२ ऑगस्ट २०१९ नुसार बिंदूनामावली दिलेली स्थगिती उठवावी, विद्यापिठाप्रमाणे संलग्नित महाविद्यालयात कॉन्ट्रैक्ट बेसिस वर प्राध्यापक नियुक्तीला परवानगी दयावी, महात्माफुले समग्र वांग्मय दहा रुपयात उपलब्ध करुन दयावे, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधे त्वरीत सुधारणा करण्यात यावी, महाविद्यालयात रीक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची रीक्त पदे १००% पदे त्वरीत भरावी, आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.