घुग्घुस येथे भाजपाला खिंडार; ज्येष्ठ नेते निरंजन डंभारे व केतन वझे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

चंद्रपूर : घुग्घुस येथील काँग्रेस पक्षाच्या जनविकासाच्या कामामूळे काँग्रेस पक्षात विविध पक्षाचे नेते व कार्यकर्ते प्रवेश करीत आहे.

आज बुधवारी खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या निवासस्थानी किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते निरंजन डंभारे व युवा नेते केतन वझे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी प्रेमानंद जोगी, लखन हिकरे, प्रफुल हिकरे,योगेश ठाकरे , राजकुमार मुळे उपस्थित होते.