देवाची विटंबना करणाऱ्या माथेफिरूस तात्काळ अटक करा : विवेक बोढे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथील बहिरमबाबा देवस्थान कॉलरी नं. 2 परिसरातील शिव मंदिरातील शिवमुर्तीची अज्ञात माथेफिरूने विडंबना केली. फिर्यादी संदीप आनंदराव भोंगळे (41) रा. श्रीराम वार्ड, घुग्घुस सफाई कामगार हा सफाई करीत असतांना घडलेला प्रकार दिसला. ही माहिती मिळताच बहिरमबाबा देवस्थान कमेटी कॉलरी नं. 2 चे अध्यक्ष शाम आगदारी यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी ही माहिती भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांना दिली सहा. पो.नि मेघा गोखरे, सहा. पोलीस निरीक्षक ए.एस. टोपले, पोलीस उप निरीक्षक गौरीशंकर आमटे व पोलीस पथकाने त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शिवमुर्तीची विधिवत पूजा केली व नंतर या मूर्तीला तिथून काढून पोलिसांच्या वाहनात टाकून बाहेर नेण्यात आले.

दरम्यान चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शिवमुर्तीची विडंबना करणाऱ्या माथेफिरूस तात्काळ अटक करण्याची मागणी केली. येथील शिव मंदिरात भगवान शिवजीच्या मूर्तीची माथेफिरूने विडंबना केली आहे ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. अश्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला शोधून काढून त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली तसेच प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावावे जेणे करून असे कृत्य घडल्यास आरोपीस शोधण्यासाठी मदत मिळणार असे ते म्हणाले.
लवकर या ठिकाणी शिव मूर्तीची स्थापन करण्यात येणार आहे.

यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते संजय तिवारी, माजी उपसभापती पं.स. निरीक्षण तांड्रा, वेकोलीचे सुनील कपूर, भाजपाचे सुरेंद्र जोगी, विनोद जंजर्ला, देवस्थान कमेटीचे भीमराव अट्टेल, रामस्वामी कोंडावार, विकास बारसागडे, श्रीनिवास आगदारी, सुब्बाराव अट्टेला, राजू इरला, बापूराव अट्टेला उपस्थित होते. हे देवस्थान पुरातन कालीन असून येथे गुफा आहेत या गुफ़ांचा रस्ता चंद्रपूर महाकाली पर्यंत निघतो असे येथील भाविकांचे मानने आहे. येथील देवस्थानाला कॉलरी नं. 2 चे तेलगू भाषिक व घुग्घुस वासिय आराध्य दैवत मानतात. या देवस्थानात नवस, लग्न समारंभ, पूजा पाठ केली जाते.