पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही – डॉ.वासलवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 विदर्भ साहित्य संघाची पोंभुर्णा येथे निसर्ग सहल

चंद्रपूर : मानवी जीवनात संतुलीत आहाराचे जितके महत्त्व आहे तितकेच मानसीक संतुलन टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यासाठी साहित्य आणि छंद जोपासणे गरजेचे आहे. आयुष्याला पुस्तकेच ज्ञानवर्धक असतात. पुस्तकांसारखा दुसरा खरा मित्र नाही, असे प्रतिपादन डॉ.अशोक वासलवार यांनी केले.

विदर्भ साहित्य संघ गोंडवन शाखा चंद्रपूरच्या साहित्य समीती तर्फे इको पार्क पोंभुर्णा येथे निसर्ग सहलीचा उपक्रम पार पडला. यात अनुभव कथन कार्यक्रमात डॉ.वासलवार यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.शरदचंद्र सालफळे होते. साहित्य क्षेत्रातील दिग्गजांशी आलेला संबंध त्यांनी मिस्कील शब्दात वर्णन केले. निसर्गरम्य वातावरणात स्वरचित तथा इतरांच्याही भावलेल्या कथा, कविता प्रसंगवर्णन, स्वानुभव कथनाचे सादरीकरण निसर्ग सहलीत उपस्थित साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी केले.

निसर्ग सहल उपक्रमात किशोर जामदार, अॅड वर्षा जामदार, नाट्यकर्मी श्रीपाद जोशी, स्मिता जोशी, मुक्ता बोझावार, हेमा बहादे, जितेंद्र बोझावार, चैताली खटी, डॉ.पद्मरेखा धनकर, मो.बा देशपांडे, नरेंद्र टिकले आदींनी सहभागी होत चैतन्य निर्माण केले. प्रास्ताविक साहित्य समिती प्रमुख गोपाल शिरपूरकर यांनी केले. संचालन मो.बा देशपांडे यांनी तर आभार या उपक्रमाचे व्यवस्थापक डाॅ.परमानंद बावनकुळे यांनी मानले.