चंद्रपूर : घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणीचे RT, PCR व अँटीजेन चाचण्या नियमितपणे करण्यात येत असून जानेवारी 2021 ते एप्रिल महिन्या पर्यंत 2280 RT, PCR चाचण्या करण्यात आले यामध्ये 390 केसेस हे पॉजीटीव्ह निघाले .
1710 लोकांचे अँटीजेन चाचण्या करण्यात आले यामध्ये 170 पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आलेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे राजीव रतन रुग्णालय, जिल्हा परिषद शाळा घुग्घुस, नकोडा, पांढरकवडा, शेंणगाव, पिपरी, मारडा, याठिकाणी लसीकरण केंद्र शुरू असून यामध्ये 45 वर्षावरील 4690 लोकांनी कोरोना लसीकरण करून घेतले आहे.
यापैकी कुणालाही लसीकरणाचे दुष्परिणाम झालेले नाहीत. तरी नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासक निलेश गौड,प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वाकदकर यांनी केले आहे.