चंद्रपूर : महाप्रज्ञा बुध्द विहार बल्लारपूर येथील अनेक कार्यात स्वतःहा सहभाग घेत समाजाला योग्य मार्गदर्शन करून आदर्श निर्माण करणारा आंबेडकरी कार्यकर्ता आमच्यातुन हिरावला त्यांचे कार्य हे सदैव प्रेरणा देणारे होते असे मत बल्लारपूर चे ख्यातनाम गीतकार व कवी संजय लोहकरे यांनी महाप्रज्ञा बुध्द विहार गणपती वार्ड बल्लारपूर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त आयोजीत सामाजीक कार्यकर्ते घनश्याम गोसावी यांना समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते बोलत होते.
महाप्रज्ञा बुध्द विहार गणपती वार्ड बल्लारपूर येथे नुकतीच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रथम महाकारुनीक गौतम बुद्ध व भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण माजी उपाध्यक्ष गीतकार संजय लोहकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित बौध्द उपासक व उपासिका यांनी पुष्प अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली. लगेच घनश्याम गोसावी यांना उपस्थित उपासक व उपासिका तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
घनश्याम गोसावी यांचे 23 एप्रिल ला निधन झाले. समाजाच्या व बुध्द विहाराच्या प्रत्येक कार्यात सहभागी होवुन मार्गदर्शन करीत घनश्याम गोसावी हे समाजाच्या कार्यात व अन्य मित्र परिवारांच्या सुखः दुखःत ते अग्रेसर असायचे. त्यांचे कार्य हे सदैव प्रेरणा देणारे होते. असे मत श्रीमती ज्योती सातपुते,चंदन ढोके,शालीक डंभारे यानी व्यक्त केले. या कार्यक्रमाला अंबादास पाटील, हरिदास डंभारे,रुपेश मुरमाळे, दीपक थुल,अजय साव,राजु लोहकरे, वसंत मुन,अरुण पाटील,नरेश नाईक,तर महिला सुभद्राबाई रामटेके,प्रेमीलाताई मुन,सावित्रीबाई दुर्गे, वंदना लाकडे,सुमित्रा ढोके,इंदुबाई कांबळे,प्रेमीलाताई मेश्राम,देवकाबाई दुर्गे, लिलाबाई खोब्रागडे, लाकडे ताई, इत्यादी उपासक उपासिका या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चंदन ढोके तर उपस्थितांचे आभार सिध्दार्थ गोसावी यांनी मानले.