यावेळी सभागृह नेता संदीप आवारी, नगरसेवक सर्वश्री सुभाष कासनगोट्टुवार, संजय कंचर्लावार, विशाल निंबाळकर, प्रदीप किरमे, नगरसेविका शीला चव्हाण, माया ऊईके, आशा आबोजवार, शितल कुळमेथे, सीमा रामेडवार, अनुराधा हजारे, कल्पना बगुलकर, वंदना जांभुळकर, देवानंद वाढई छबुताई वैरागडे आदी उपस्थित होते.
कोरोनाला कायमच हद्दपार करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एकमात्र पर्याय आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना लस घेण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी तसेच लस घेतलेल्या नागरिकांना शुभेच्छा म्हणून सेवा दिनानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे N-95 मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तींनी लस घ्यावी, असे आवाहनही महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
यासोबतच स्वतःचा जीव धोक्यात टाकून वर्षभरापासून मृत पावलेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले.