• मोदी सरकारच्या कार्यकाळात देश काळोखात : जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांची टीका
चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकारने मागील सात वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले नाही. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोरोना साथरोग नियोजनात अपयश आले आहे. पेट्रोल, डिझेलची दररोज भाववाढ होत आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे अपयशी निर्णय घेतले. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरीविरोधात काळे कायदे करण्यात आले. मोदी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मागील सात वर्षांत देशात काळोखच पसरला असल्याची टीका चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात रविवारी (ता. ३०) कस्तुरबा चौकात केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी रितेश (रामू) तिवारी बोलत होते. यावेळी चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या प्रदेश महासचिव नम्रता आचार्य-ठेमस्कर, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेविका सुनीता लोढिया, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव अॅड. मलक शाकिर, उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे यांनी मनोगतातून केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी काळ्या रंगाचा मुखवटा असलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यावर केंद्र सरकारच्या अपयशाच्या विषयांचे फलक लावण्यात आले होते. प्रास्ताविक गोपाल अमृतकर यांनी, तर आभार एनएसयुआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे यांनी मानले. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली. आंदोलनात ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, अनुसूचित जाती आघाडीच्या अनुताई दहेगावकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी नगरसेवक संतोष लहामगे, नगरसेविका ललीता रेवल्लीवार, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार, माजी नगरसेवक राजेश अडूर, इंटक युथ जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, रुचित दवे, शाहिल कादर, चंद्रमा यादव, नौशाद शेख, सुनंदा धोबे, सुरेश खापने, पप्पूभैय्या सिद्दीकी, इरफान शेख, कासिफ अली, केतन दुर्सेलवार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, राकेश मार्कंडेवार, कृणाल रामटेके, राजू त्रिवेदी, सुलेमान अली, विजय धोबे, राजू वासेकर, वायफडे गुरुजी, प्रकाश देशभ्रतार, यश दतात्रय, रुषभ दुपारे, संदीप सिडाम, वसीम शेख, संकभाऊ गंपावार, राजेश रेवल्लीवार, निखिल काच्छेला, अंकुर तिवारी, सूर्य अडबाले, अॅड. वाणी दारला, शीतल काटकर, स्वाती त्रिवेदी, कल्पना गिरडकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.